परिसरात सतत सुरू असलेल्या पावसाने, शेतकऱ्यांचे सर्वच प्रकारच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, आज दिनांक 21 सप्टेंबरला दुपारी दोन वाजता चे दरम्यान भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुखदेवराव पवार यांनी वनोजा येथील शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचून, पावसामुळे नुकसान झालेल्या पिकाची पाहणी केली. शासनाने तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी सुखदेवराव पवार यांनी कृषिमंत्र्याकडे केली आहे