सेनगांव तालुक्यातील सवना येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकांची काही पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असुन शिक्षण विभागाचे लक्ष वेधण्यासाठी सवना या ठिकाणी आज गावकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन पुकारून निषेध नोंदविण्यात आला आहे. अनेक वेळा निवेदन,पत्र देऊनही कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात न आल्याने अखेर प्रहारचे जिल्हाध्यक्ष विजय वानखेडे तसेच गावकऱ्यांच्या वतीने भव्य असा रास्ता रोको आंदोलन पुकारुन निषेध नोंदविण्यात आला.