धुळे शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी धुळे महानगर संघर्ष समितीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ अभिनव आंदोलन केले. यात एका कार्यकर्त्याने गणपती बाप्पाची वेशभूषा धारण केली होती. मनपा प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात घोषणाबाजी करत आंदोलकांनी तीव्र रोष व्यक्त केला. विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी करण्यात आली.