आज ६ सप्टेंबर रविवार रोजी सकाळी साडे १० वाजता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पार्पण करुन विद्यापीठाच्यावतीने अभिवादन केले. जयंती कार्यक्रमाला जनसंपर्क विभागातील कर्मचारी उपस्थित होते. संचालन व राजे उमाजी नाईक यांच्याबद्दल माहिती जनसंपर्क विभागातील सुनिल महल्ले यांनी दिली