मंत्रालय, मुंबई येथे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे व आ. किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत चंद्रपूर जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर आज दि 25 आगस्ट सायंकाळी 5 वाजता महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत चंद्रपूर व घुगुस येथील पट्ट्यांचे सर्वेक्षण करून सहा महिन्यांत पट्टे देणे, संजय गांधी योजनेंतर्गत तहसीलदार रिक्त पदे त्वरित भरून कार्यवाही पूर्ण करणे, नझूलसाठी तलाठी नियुक्त करणे यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर आदेश देण्यात आले.