कल्याण परिसराच्या गांधारी रोड येथे एका कपड्याच्या दुकानांमध्ये दुकानदारासमोरच चोरी झाल्याची घटना घडली आहे. कल्याणच्या गांधारी रोड परिसरातील एकविरा कलेक्शन या कपड्याच्या दुकानांमध्ये तीन ते चार महिला आल्या आणि वेगवेगळे कपडे काढायला लावला आणि अत्यंत हातचालाखीने त्यातील काही कपडे चोरी केले. ग्राहक गेल्यानंतर दुकानातील काही कपडे नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर सीसीटीव्ही पाहिले असता हा प्रकार समोर आला असून या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असल्याची माहिती मिळत आहे.