गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत डीजे वाजवण्याच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे यांनी प्रशासनासमोर ठाम भूमिका घेत स्पष्ट शब्दांमध्ये इशारा दिला. डीजे वाजवायला तुम्ही परवानगी द्या अथवा देऊ नका, आम्ही मात्र डीजे वाजवणारच. हवा तर आजच आम्हाला आत टाका, आमच्या भावना तीव्र आहेत. आवाज मोजण्याचा मशीन आणला आहे तुम्ही आवाज तपासा, असं संतप्त स्वरात ते म्हणाले.