24 ऑगस्टला रात्रीच्या सुमारास कुणाल चवरे सह चौघेजण मामाच्या ढाब्यावर जेवायला गेले.यावेळी चौघामध्ये वाद झाला.तो वाद सोडविण्याकरिता गेलेल्या ढाबा मालक भीमराव लोहकरे यांना चौघांनी मारहाण करून खुर्च्याची फेकफाक व वाहनांची तोडफोड केल्याची घटना धामणगाव रोडवरील मामाचा ढाब्यावर 24 ऑगस्टला रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलीसात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध यवतमाळ ग्रामीण पोलीसात गुन्हे दाखल करण्यात आले.