परभणी तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंह पोखर्णी येथील सकल मराठा समाज बांधव मुंबईच्या दिशेने निघाले आहेत, संघर्ष योद्धा मनोज जरागे पाटील यांनी 29 ऑगस्ट रोजी मुंबई येथे आंदोलन करण्याची घोषणा केल्यानंतर दोन दिवस अगोदरच आज बुधवार 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 30 वाजेच्या सुमारास श्री क्षेत्र नृसिंह पोखर्णी गावातून सकल मराठा बांधव मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी मुंबईकडे निघालेले आहेत,