पहिल्यांदा न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार रिक्त जागेवर बदली कामगारांना कायम करा, कारण वर्षानुवर्ष घोंगडे भिजत घातले आहे. त्याचा सर्वप्रथम निपटारा करवा. त्यानंतरच शिल्लक जागेवर सरळ सेवा भरती प्रक्रिया सुरू करावी. अन्यथा अन्यथा न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा, निवेदनाद्वारे ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हाच्या वतीने, मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांना दिले आहे.