वाडांबा एस.टी. स्थानकासमोर भरधाव कारने (एम.एच.०३- बी.सी.९४६२) पादचारी प्रवासी महिलेला ठोकर मारून फरफटत नेले. यात त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज (दि.५) दुपारी १२ च्या सुमारास घडला. किशोरी किसन जावळेकर (वय ४५, रा.केलटे) असे मृत महिलेचे नाव आहे. यावेळी मृत महिलेसोबत प्रवास करणाऱ्या अंगणवाडी सेविका दैवबलवत्तर म्हणून बचावल्या.