ड्रीम कॅस्टल सिग्नल,मखमलाबाद रोड,हनुमान वाडी तसेच मुख्य रस्त्यांमध्ये गुडघाभर खड्डे पडल्याने अनेक लहान-मोठे अपघात होत आहे.काहींना या अपघातात आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे.मनपाने तीन ते चार वेळेस टेंडर काढूनही हा रस्ता तात्पुरत्या स्वरूपात डाग डुगी करण्यात येतो त्यामुळे पुन्हा रस्त्याची दुरावस्था होते सदर रस्ता तात्पुरता स्वरूपात डांबरीकरण न करता कायमस्वरूपी काँक्रिटीकरण करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अँड सुरेश आव्हाड यांनी केली आहे.