पुणे शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध मंडळांनी उभारलेल्या देखाव्यांना नागरिकांची उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सकाळपासूनच मंडळांच्या मंडपात लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. ऐतिहासिक घटनांचे चित्रण, सामाजिक संदेश देणारे तसेच आकर्षक प्रकाशयोजना केलेले देखावे नागरिकांना खिळवून ठेवत आहेत. विशेषतः शनिवार वाडा, कसबा गणपती परिसरासह प्रमुख मंडळांपुढे मोठी गर्दी उसळली आहे. लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिक देखील या