पवनी तालुक्यातील केसलवाडा येथील मनोज महिपाल दाभोळे वय 50 वर्षे हे दिनांक 22 ऑगस्ट रोजी मोटरसायकलने मुलाला भेटण्याकरिता नवेगाव ठाणे येथे जाऊन परत येत असताना मौजा भावड ते पिंपळगाव रोडवर पिंपळगाव जवळ स्वतः मोटरसायकल वरून पडून रस्त्याच्या बाजूच्या इलेक्ट्रिक खांबावर आढळल्याने मार लागून त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस स्टेशन मर्ग दाखल करण्यात आला असून या घटनेच्या पुढील तपास पोलीस हवालदार डेकाटे हे करीत आहेत.