दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांपैकी 4 जण अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले असून, पोलिसांनी एकाच्या ताब्यातून 3 लाख 11 हजार 500 रुपयांचा ऐवज व साहित्य जप्त करण्यात आले आहे.आडगाव पोलीस ठाण्याचे पथक रात्रीची गस्त घालत होते. पहाटेच्या वेळी आडगाव शिवारातील वाढवणे कन्स्ट्रक्शन्स अॅण्ड इंजिनिअरिंगसमोर आरोपी समीर प्रमोद पाटील, पवन पाटील व त्यांच्यासोबत इतर संशयितरित्या उभे होते.पोलिसांना पाहून चौघांनी पळ काढला तर समीर पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.