संपूर्ण देशामध्ये वोट चोरी करून सध्याचे सरकार सत्तेत आल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात येत असून त्याच्या निषेधार्थ आज युवक काँग्रेसच्या वतीने ठाण्यात आंदोलन करण्यात आले. तसेच ठाण्यामधील मतदान यादीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचा आरोप युवक काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष आशिष गिरी यांनी केला. यासंदर्भात आम्ही अभ्यास करणार आहोत आणि जर चुकीच्या गोष्टी निदर्शनास आल्या तर त्यामध्ये बदल करावा आणि बदल केला नाही तर आम्ही आक्रमक भूमिका घेऊ असा इशारा आंदोलनादरम्यान दिला आहे.