मुंबईतील आझाद मैदानावर गेल्या चार दिवसांपासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रभरातून हजारो मराठा आंदोलन मुंबईत दाखल झाले आहेत. एकीकडे गणेश उत्सवासाठी येणारे गणेश भक्त आणि दुसरीकडे मराठा आंदोलन यामुळे मुंबई,नवी मुंबई, ठाणे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. सायन पनवेल रोडवर वाशी टोलनाक्यावर देखील प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून मानखुर्द पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.