लातूर -महाराष्ट्रातील नामवंत शिक्षणतज्ज्ञ, संशोधक व समाजसेवक डॉ. संदीपान गुरुनाथ जगदाळे यांना शिक्षण क्षेत्रातील अद्वितीय व बहुआयामी योगदानाबद्दल भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने आयोजित भव्य समारंभात त्यांचा आज दिनांक पाच सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान गौरव करण्यात आला.