बाजारपेठेत बंदी असलेले सिंगल यूज कॅरिबॅगची विक्री करताना आढळून आल्याने नगर परिषदेच्या भरारी पथकाने धाड टाकून कॅरिबॅग जप्त केले. या कारवाईत दहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नगर परिषदेच्या भरारी पथक बाजारपेठेत गस्त घालत असताना दीपक हजारे रा. महाराणा प्रताप वार्ड हा आपल्या दुचाकी वाहनावर पोत्यामध्ये सिंगल यूज कॅरिबॅग विक्री करीत होता. सदर इसमाची गाडी व पोत्याची झडती घेतली असता जवळपास पाच ते सात किलो सिंगल यूज कॅरीबॅग मिळाले.