शासनाच्या जीआरची केली होळी लातूर – महाराष्ट्र शासनाने ओबीसी समाजाच्या विरोधात काढलेल्या जीआरचा निषेध म्हणून सकल ओबीसी बांधवांच्या वतीने लातूर येथे आज दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देऊन जाहीर आंदोलन करण्यात आले. यावेळी ओबीसी समाजाच्या हक्काचा संघर्ष अधोरेखित करण्यात आला व शासनाचा जीआर फाडून जाळण्यात आला.