शिक्षक हा समाज घडवणारा शिल्पकार आहे. शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांचे कार्य लक्षवेधी आहे. नव्या पिढीला दिशा देण्यासाठी सातत्याने शिक्षक झटत असतो. त्यामुळे शिक्षक सेवानिवृत्त झाला तरी कधीही माजी होत नाही. तो आजीवन शिक्षकच असतो. त्यामुळे समाज घडवणाऱ्या शिक्षकांचा गौरव करणे ही समाजाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन आमदार सुधाकर अडबाले यांनी केले.