माजरी रेल्वे जंक्शनवरील तिकीटघरात चोरी करुन अज्ञात चोरट्यांनी तिकीटघरातील संगणासह अन्य साहित्य लांबविल्याची घटना माजरी रेल्वे जंक्शनवर दिनांक ३ रोज बुधवारला सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. घटनास्थळी सिसीटिव्ही कैमेरे नसल्याने तपासात अडथळा येत आहे.या घटनेवरुन येथील सुरक्षा व्यवस्थेवर शंका ऊपस्थीत केल्या जात आहे.श्वानपथकाच्या सहाय्याने पोलीस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहे. यापुर्विही येथे चोरी झाली होती त्यात चोरट्यांनी तिकीटघरातील सत्तर हजार रुपये लांबविले होते.