आज दिनांक 22 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथरी येथील सात विद्यार्थिनी जलजीरा प्राशन केल्याने विषबाधा झाली होती. त्या सातही विद्यार्थिनींना गोरेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कॉपरेटिव बँकेचे संचालक दुर्गाप्रसाद ठाकरे यांनी त्यांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली व उपस्थित डॉक्टरांना व्यवस्थित औषध उपचार करून काळजी घेण्याचे निर्देश दिले.