छत्रपती संभाजीनगर : हर्सूल कारागृहात सोमवारी ७ सप्टेंबर दुपारी कैद्यांनी गोंधळ घातला. यार्डमध्ये गस्त घालताना पाच कैदी संशयास्पदरीत्या एकत्र आढळले. या वेळी एका कैद्याकडे धारदार वस्तू सापडली. तपासणी केल्याने ते आक्रमक झाले तसेच तुरुंग अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.