शहरात आज गुरुवारी सर्वत्र दहीहंडी उत्सवाची धूम होती दुपारी एक वाजताच्या सुमारास नरसिंग महाराज प्रांगण येथून पहिली मानाची दहीहंडी फोडल्यानंतर शहरातील यात्रा चौक कालंका चौक सोमवारवेस मोठे बारगण जवाहर रोड जयस्थंभ चौक,सोनू चौक,शिवाजी महाराज चौक, हिवरखेड रोड ,बस स्थानक मार्गअकोला मार्ग वरून गवळी पुरा चौक येथे दहीहंडी उत्सवाची सांगता करण्यात आली यावेळी गोविंदा पथकांनी शहरातील विविध भागातील दहीहंडी फोडून दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा केला.