कळंब तालुक्यातील मोहा गावात स्मशानभूमीच्या वादातून दोन गटात दिनांक 26 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वाजता झालेल्या राड्यानंतर गावाला छावणीचे स्वरूप आले आहे. गावात शंभर चे दीडशे पोलिसांचा फौज फाटा तैनात असून दंगल नियंत्रण पथकही तैनात करण्यात आला आहे. स्मशानभूमीच्या जागेवरून झालेल्या वादात दगडफेकीनंतर पोलिसांसह आठ ते दहा लोक जखमी झाले. महसूल आणि पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी गावात ठाण मांडून असून या प्रकरणी अद्याप कोणावर गुन्हा दाखल झालेला नाही.