मा.श्री.अर्चित चांडक पोलीस अधीक्षक अकोला यांचे निर्देशाप्रमाणे जिल्हयामध्ये अवैध धंदे नष्ट करण्यासाठी ऑपरेशन 'प्रहार' मोहीम राबविण्यात येत आहे.त्यानुसार शुक्रवार दि.१ऑगस्ट रोजी दुपारी उरळ पोलिसांनी अंत्री मलकापूर येथे अवैध रित्या सुरु असलेल्या गावठी हातभट्टी दारूच्या अड्डयावर धाड टाकली व आरोपी रामसिंग उकर्डा डाबेराव रा.अंत्री मलकापूर यांना रंगेहात पकडण्यात आले.व ७ लोखंडी पत्र्याचे पिंपामध्ये १०५ लिटर मोहा सडवा व ५ लिटर गावठी दारू असा ३,५००चा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला.