भाजपा नेते पाशा पटेल यांनी धाराशिव दौऱ्यात असताना शेतकऱ्यांनी आता नुकसानीची नुकसानीची सवय लावून घ्यावी अस विधान केल होते.या विधानावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली असुन पाशा पटेल यांनी केलेले वक्तव्य संतापजनक असुन पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांच्या जागेवर येवुन बघाव व या सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत करावी अन्यथा येणाऱ्या काळात संभाजी ब्रिगेड तिव्र आंदोलनाचा करेल असा इशारा गायकवाड यांनी दि.२४ ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता कळंब येथे माध्यमांशी बोलताना दिला आहे.