धोम धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्याची स्वच्छता सिंचन विभाग आणि यांत्रिकी विभागाकडून गतीने सुरू आहे. धोम धरण पाणी बचत संघर्ष समिती त्यावर लक्ष ठेवून आहे. कालव्यालगत असणाऱ्या शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा कचरा कालव्यामध्ये टाकू नये. कालवा खराब करू नये, तसेच भविष्यकाळात कालवा स्वच्छतेचे काम करावे लागू नये, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन समितीमार्फत करण्यात आले आहे. समितीचे अध्यक्ष सी.आर.तथा चंद्रकांत बर्गे आणि कार्याध्यक्ष रणजीत फाळके यांनी रविवारी दुपारी दोन वाजता दिली.