तालुक्यात चिंचोली येथे राहणार 32 वर्षीय उमेश तुकाराम वांढरे याने त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तसेच जळगाव मंगरूळ येथे राहणार राजेंद्र रामभाऊ चौधरी वय वर्ष 59 यांनी सुद्धा त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. घटने ची माहिती मंगरूळ दस्तगीर पोलिसांना देण्यात आले .मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेहांना शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे येथे आणले .घटनेचा पुढील तपास मंगरूळ दस्तगीर पोलीस करीत आहे.