शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटारसायकल चोरीचा तपास करत असताना मोठा गुन्हा उघडकीस आला आहे.याप्रकरणी एका संशयितास अटक करून त्याच्याकडून एकूण ११ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.यात एक हिरो स्प्लेंडर मोटारसायकल व एक JCB मशीनचा समावेश आहे.फिर्यादी हरीशचंद्र कांरडे (वय ३९, रा. मिरज) यांच्या मालकीची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल (MH-10-BS-1840) अज्ञात चोरट्याने शिरोळ गावाजवळून चोरून नेली असल्याची तक्रार ३ सप्टेंबर २०२५ रोजी शिरोळ पोलीस ठाण्यात दिली होती.