कुरुम येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे जनसंवाद कार्यक्रम अभियानांतर्गत गुरुवार २८ ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या दरम्यान उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी संदीप कुमार अपार यांच्या अध्यक्षतेखाली तालुका कृषी अधिकारी दीपक तायडे यांच्यासह सर्व विभागाचे प्रतिनिधी च्या उपस्थितीत जनसंवाद कार्यक्रम बैठक पार पडली यावेळी कुरुम मंडळाचे शेतकऱ्यांचे विविध समस्याचे ५४ अर्ज प्राप्त झाले असता त्या अर्जावर तात्काळ निर्णय घेण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सरपंच अतुल वाट,सदस्य समवेत शेतकऱ्यांची उपस्थिती होती.