आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी अकोला महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली आहे. नव्या आराखड्यानुसार शहरात २० प्रभाग असणार असून, प्रत्येक प्रभागातून चार नगरसेवकांची निवड होणार आहे. यामुळे यंदाच्या निवडणुकीत एकूण ८० नगरसेवक निवडले जातील. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची एकूण लोकसंख्या ५,३६,७२६आहे. त्यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या ९०,९६१ तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या ११,५७४ आहे. प्रभागांमध्ये सर्वाधिक लोकसंख्या प्रभाग क्रमांक ९ मध्ये २९,३२९, तर किमान लोकसंख्या प्रभाग क्रमांक १२ मध्ये २४