धुळे येथील शिव कॉलनी परिसरात राहणारे सेवानिवृत्त शिक्षक संजय लोटन पाटील (वय ५८) हे जळगावातील गोलाणी मार्केट परिसरातील रस्त्यावरून सोमवारी १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून बेपत्ता झाले आहेत. याबाबत मंगळवारी २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.