पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथे पोलिसांनी बोगस डॉक्टरांवर कारवाई केली. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, तीन ते चार जण कोणतीही वैद्यकीय पदवी अथवा परवाना नसताना उपचार करत होते. तालुका पोलिसांनी तत्काळ धाड टाकून तिघांना पकडले. त्यांच्याकडे कोणतेही वैद्यकीय कागदपत्र अथवा परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात औषध साठाही जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे.