भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण देखील मोठ्या उत्साहात साजरा केला. भाजपाच्या गोरेगांव मंडळ महीला तालुकाध्यक्षा सारिका ताई लांडे यांच्यासह भाजपाच्या महिला पदाधिकारी उपस्थित होते. तसेच विविध राजकीय विषयावर याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केल्याची माहिती आज दिनांक 23 ऑगस्ट रोजी रात्री 7 वाजता प्राप्त झाली.