शिंगणापूर रॉ वॉटर पंपिग स्टेशन येथील 33 केव्ही सब स्टेशन दुरुस्तीचे काम पुर्ण झाल्याने आज शिंगणापूर रॉ वॉटर पंपिग स्टेशन येथील ट्रॉन्सफॉर्मचे हिटींग करुन पंपिग स्टेशनची चाचणी घेण्यात आली. सायंकाळी सदरची चाचणी पूर्ण झाल्याने रात्रौ 8 वाजता तीन पंपाद्वारे शिंगणापूर येथून पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे.