अहमदाबाद विमान अपघातामध्ये डोंबिवलीतील 27 वर्षी रोशनी सोनघरे या तरुणीचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लहानपणापासून एअर होस्टेस होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या रोशनी सोनघरे ने तिचे स्वप्न पूर्ण केले होते. त्यासाठी तिच्या आई-वडिलांनी देखील अफाट मेहनत घेतली होती. दोन दिवसांपूर्वी गावी येऊन कुलदैवतेचे दर्शन घेऊन सर्वांना भेटून ती गेली होती. आता लग्नाचा देखील विचार सुरू होता आणि तशी चर्चा आम्ही करत होतो अशी प्रतिक्रिया रोशनी सोनघरेचे मामा प्रवीण सुखदरे यांनी दिली.