आडगाव या गावाकडून श्रीक्षेत्र मनुदेवी येथे जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावर मानापुरी गाव आहे या गावाच्या पुढील वळणावर दुचाकी क्रमांक एम. एच.१९ ए. ए.१८६५ द्वारे दगडू पंडित लोहार वय ३२ हा जात होता त्याला क्रुझर वाहन क्रमांक एम. एच.१९ सी. यु.००२६ वरील अज्ञात चालकाने धडक दिली यामध्ये दगडू लोहार हा गंभीर जखमी झाला त्याला उपचाराकरिता जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तरी याप्रकरणी यावर पोलीस ठाण्यात क्रुझर वाहनावरील चालकाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे