भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्यावरती वादग्रस्त टीका केली होती. यावर आमदार रोहित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधला आहे. हे वक्तव्य चुकीचा असून आम्ही त्याचा निषेध करत असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. पडळकर यांना कोणाचातरी वरदस्त असल्यामुळे त्यांचा अहंकार वाढला आहे. त्यामुळं भाजपने अशा नेत्यांचा बंदोबस्त केला पाहिजेन अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.