आज ४ सप्टेंबर गुरुवार रोजी सकाळी साडेअकरा वाजता अमरावती महानगरपालिका नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्र. १, जिल्हा सामान्य रुग्णालय कार्यक्षेत्रातील चपराशीपुरा, अमरावती येथील संतोषी बाल गणेशोत्सव मंडळ, सुंदरलाल चौक येथे आज आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण ६२ लाभार्थ्यांनी विविध तपासण्या व उपचारांचा लाभ घेतला. शिबिरामध्ये लाभार्थ्यांचे आयुष्मान भारत (आभा) व गोल्डन कार्ड नोंदणी, रक्त तपासणी, क्षयरोग, त्वचारोग, कुष्ठरोग तसेच इतर स