शिवनी भंडारबोडी शिवारात गुजराती मेंढपाळ परिवार मागील दोन पिढ्यांपासून बकरी मेंढ्यांचे पालन करून उदरनिर्वाह करतात. अशातच शनिवार दि. 6 सप्टेंबर व रविवार दिनांक 7 सप्टेंबर च्या मध्यरात्री तीन वाजताच्या दरम्यान काही चोरट्यांनी पिकअप वाहन क्रमांक mp 51 जी 16 54 द्वारे मेंढ्या व बकऱ्या चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र या मेंढपाळांच्या सतर्कतेने तो हाणून पाडण्यात आला. या चोरीत सामील तीन जणांना पकडून रामटेक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.