राज्य सरकारने देऊ केलेल्या ओबीसी आरक्षणाच्या विरोधात देशाचे ओबीसी नेते छगनरावजी भुजबळ यांनी कोर्टामध्ये चॅलेंज करू असे आव्हान दिले आहे. यावर जरांगे म्हणतात की, आम्ही मंडल आयोगाला चॅलेंज करू, हे तर हास्यास्पद आहे. मंडल आयोग हा संपूर्ण देशामध्ये लागू करण्यात आला आहे. जरांगेच्या या अज्ञानाने सर्वांनाच हसावे की रडावे समजेना, अशी टीका ओबीसी नेत्या स्नेहा सोनकाटे यांनी ६ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता केली आहे.