धुळे जिल्ह्यातील सोनवद धरणात जाणारे पाणी मध्येच अडवले जात असल्याची तक्रार वालखेडा, डोंगरगाव, अचलपूर, कलमाडी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. पांझरा नदीला पूर असूनही काही शेतकरी मुद्दाम गेट बंद करून पाणी अडवत असल्याचा आरोप करण्यात आला. या गंभीर प्रकाराकडे पाटबंधारे विभाग दुर्लक्ष करत असल्याने शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असून तातडीने उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.