वरोरा तालुक्यातील नागपूर-चंद्रपूर हायवेवर सिटी पॉइंट हॉटेलजवळील हसन अमूल शॉपी मध्ये पुन्हा एकदा चोरीची घटना आज दि 26 आगस्ट 10 वाजता सकाळी घडली आहे. स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये यामुळे मोठी दहशत पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आतील रोकड आणि काही मौल्यवान सामानावर हात साफ केला.दुकानांमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही घटना रात्री 1.30 वाजता कैद झाली आहे.