लातूर-बुध्दगया येथील महाबोधी बुध्द महाविहार बौध्दांच्या ताब्यात द्यावा, या मागणीसाठी लातूरात बुधवारी भव्य पदयात्रा आज दिनांक 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क या मार्गावर ५०० फुटी धम्मध्वजासह निघालेल्या या पदयात्रेस मोठा जनसमुदाय लाभला.