लातूर -गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र विसर्जन मिरवणुकीचा उत्साह ओसंडून वाहत असताना, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महावितरणने महत्त्वाचे आवाहन केले आहे. मिरवणुकीदरम्यान वीजवाहिन्या, विद्युत खांब तसेच ट्रान्सफॉर्मर आदी वीज यंत्रणेजवळून जाताना विशेष दक्षता घेण्याची सूचना देण्यात आली आहे.