जालना शहरातील टीव्ही सेंटर येथील रहीवासी असलेले बालाजी पवार यांच्या चारचाकी वाहनात चक्क साडेपाच फुटाचा अजगर घुसल्याने चालकाची चांगलीच घाबरगुंडी उडाली. मात्र, सर्पमित्राला माहिती दिल्यानंतर सर्पमित्रांनी मोठ्या कसरतीने अजगराचे रस्क्यु करुन त्याला जंगली अधिवासात सोडून दिले. ही घटना गुरुवार दि. 21 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 4.30 ते 5 वाजेच्या सुमारास घडली. बालाजी पवार हे त्यांची गाडी नंबर एम.एच. 21 बीएफ 7939 घेऊन ते दत्ताश्रम परिसरात प्लॉटींगच्या कामानिमित्त गेले होते,तथून ते अंबड रोडवर आले.