यावल शहरातून मार्गस्थ होणाऱ्या अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गावर दहिगाव फाट्याजवळ बुधवारी मध्यरात्री युवराज उर्फ युवा राजू भास्कर वय ३४ हा तरुण गावठी बनावटीचे पिस्तोल भूषण सपकाळे याला विक्री करत होता. पोलिसांना माहिती मिळताच पथक त्या ठिकाणी गेले व त्यांना पकडण्यात आले. दोघांना यावल न्यायालयात हजर केले असता दोघांना २८ सप्टेंबर पर्यंत ४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.