भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या राज्य मार्गावरील पालगाव मथाडी फाटा जवळ स्कुटी व कारचा अपघात झाल्याची घटना आज दि. 24 ऑगस्ट रोजी सकाळी 9.15 वा. दरम्यान उघडकीस आली आहे. विजय चीगरू गजभिये वय 65 व बाबुराव माहु कागदे वय 61 दोन्ही रा. चांदोरी हे स्कुटी क्रमांक MH 36 AF 8867 ने चांदोरी वरून भंडाराला येत असता मथाडी फाट्याजवळ पवनी कडून भंडाराला येत असलेली चार चाकी वाहन क्र. MH 36 AG 9600 ने मागेहुन जब्बर धडक दिली. त्यात विजय यांच्या डोक्याला व चेहऱ्याला मार लागून गंभीर दुखापत झाली.